Ad will apear here
Next
तरुणांना ‘वाचनामृत’ मिळण्यासाठी...
सध्याच्या धकाधकीच्या काळात निवांत वेळ काढून एखादं पुस्तक घेऊन वाचत बसणं गोड, हव्याहव्याशा स्वप्नासारखं वाटतं. काही जण ‘आळशी’ या गटात मोडत असल्याने पुस्तकाची फक्त सुरुवातच वाचली जाते. या पार्श्वभूमीवर, मुंबईच्या अमृत देशमुख या तरुणानं देशाला वाचतं करण्याचा ध्यास घेतला आहे. 

गेल्या वर्षी पुस्तकदिनी म्हणजे २३ एप्रिल २०१६ रोजी अमृतनं एक आगळंवेगळं अॅप सुरू केलं, बुकलेट नावाचं. सीए असलेला अमृत आठवड्याला एक पुस्तक वाचतो. त्या पुस्तकाचा सारांश सोप्या इंग्रजीमध्ये लिहितो आणि व्हॉट्सअॅप, फेसबुकवर दर बुधवारी टाकतो. तो सारांश साधारण २० मिनिटांत वाचून संपेल असा असतो. बघता बघता हजारोंच्या संख्येने वाचक त्याच्या या ‘बुकलेट’ उपक्रमात सहभागी होऊ लागले. व्हॉट्सअॅपवरून हे करण्याला असलेली मर्यादा लक्षात घेऊन अमृतनं बुकलेट अॅप सुरू केलं.
एवढंच करून अमृत थांबला नाही, तर ‘जास्त आळशी’ किंवा ‘जास्त बिझी’ या गटात मोडणाऱ्यांसाठी त्यानं लिहिलेल्या सारांशाचे वाचन करून त्याचा ऑडिओदेखील अॅपवर, फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. गाडी चालवताना, व्यायाम करताना इअर फोन लावायचे आणि ऐकायचं एखादं पुस्तक. ट्रेलरमध्येच अख्खा सिनेमा बघायला मिळण्याइतकं सुख असणार त्यात. सध्या अमृत इंग्रजी, बेस्ट सेलर ठरलेल्या पुस्तकांची निवड करत आहे. यामार्फत भारतातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर वाचनाशी जोडला जात आहे.
अमृतला या उपक्रमामधून भारतीय तरुणांना वाचायला लावायचे आहे. सध्या तरुण फेसबुकवर शेअर झालेले फुटकळ विनोद, येणारे मेसेज आणि फार तर बातम्या यापलीकडे काही वाचत नाही. तरुणांच्या वाचनाला अर्थ असावा, काही तरी दर्जेदार त्यांच्या वाचनात यावं यासाठी अमृतनं हा उपक्रम सुरू केला आहे. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, अशी चर्चा करत बसण्यापेक्षा ती संस्कृती पुन्हा बहरावी यासाठी अमृतनं राबवलेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZUXBB
Similar Posts
किताबें कुछ कहना चाहती हैं.... ‘मेक इंडिया रीड’ अर्थात अख्ख्या भारताला वाचनाची गोडी लावण्याचं स्वप्न घेऊन अमृत देशमुख नावाचा एक तरुण कार्यरत आहे. वाचलेल्या पुस्तकांचे सारांश तो ‘बुकलेट’ या अॅपद्वारे लाखो लोकांपर्यंत तो मोफत पोहोचवतो. हे सारांश ऑडिओ स्वरूपातही दिले जातात. वाचनामृताची गोडी लावणाऱ्या अमृतची गोष्ट पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या आजच्या भागात
मुलांनी वाचते होण्यासाठी... कल्याण : आजची मुले वाचत नाहीत ही ओरड सर्वच स्तरांतून होताना दिसते. मोबाइल, इंटरनेट आणि एकूणच तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने मुलांचे प्रत्यक्ष वाचन कमी झाले आहे. मुले तांत्रिक माध्यमांच्या मदतीने ज्ञान मिळवत आहेत. त्यांचे वाचनदेखील पाठ्यपुस्तके आणि संगणक, स्मार्टफोनवरून माहिती मिळवण्याइतकेच सीमित झाले आहे
देशातील २५० ग्रामीण शाळांमध्ये सुरू होणार वाचनालये; पुण्यातून झाली सुरुवात पुणे : ग्रामीण भागातील मुलांना चांगली वाचनीय पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने पुण्यातील ‘वाय फॉर डी’ फाउंडेशनच्या वतीने ‘बुक फॉर पर्पज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभरातील २५० शाळांमध्ये वाचनालये सुरू करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील
रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद पुणे : एम. सी. इ. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने १२ डिसेंबर २०१८ रोजी ग्रंथालयविषयक कार्यशाळा (लायब्ररी एक्सटेन्शन अॅक्टिव्हिटी) मावळ तालुक्यातील चिखलसे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language